#robbery #in #broad #daylight #at #a #petrol #pump #in #maliwada #of #aurangabad #district #breakingnews #latestnews #todaysnews #politicalnews #hindinews #a24news #and #information #services
माळीवाडा पेट्रोल पंप राॅबरी का फुटेज
औरंगाबाद जिल्ह्यातील माळीवाडा येथे भर दिवस पेट्रोल पंपावर दरोडा
पिस्तुल आणि चाकू चा धाक दाखवत टाकला दरोडा
तोंड बांधून आलेल्या दोन अज्ञात व्यक्तींनी टाकला दरोडा
पेट्रोल पंपावरील कर्मचारी रक्कम मोजत असताना पडला दरोडा
मोजणी सुरू असलेली रक्कम घेऊन दरोडेखोर झाले पसार
भरदिवसा सकाळी साडेदहा वाजता घडली
भर दिवसा पडलेल्या धाडशी दरोड्यामुळे खळबळ
माळीवाड्यात भरदिवसा पेट्रोल पंपावर पिस्तौल दाखवून सव्वा लाख लूटले...
औरंंगाबाद, दि.12
दौलताबाद जवळील माळीवाडा येथे भर दिवसा पेट्रोल पंपावर लुटमारीची खळबळजनक घटना गुरुवारी सकाळी 10.30 च्या सुमारास हर्ष पेट्रोल पंपावर घडली. पंपावरील कर्मचारी कार्यालयात पैशांची मोजणी करत असताना तोंडाला मास्क, हातात पिस्तूल आणि चाकू घेवून आत शिरलेल्या दोन लुटारूंनी कर्मचा-यांना धमकावत तेथून 1 लाख 26 हजारांची रोकड घेऊन पसार झाले. भरदिवसा सशस्त्र लुटमारीची घटना घडल्याने परिसरासह शहरात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे त्यावेळी पंपावर वाहनधारक इंधन भरण्यासाठी उपस्थित होते. तरी देखील दोन दरोडेखोरांना कोणीही रोखण्याचा प्रयत्न केला नाही. त्यामुळे रोकड घेऊन दुचाकीस्वार लुटारू तेथून धूम ठोकण्यात यशस्वी झाले.
आशिष वसंतराव काळे यांचा 2019 पासून माळीवाडा येथे हर्ष पेट्रोल पंप आहे. पंपावर शंकर संजय घोगरे वय 21 हे मॅनेजर म्हणून काम पाहतात. नेहमीप्रमाणे आज सकाळी कामकाज सुरु होते. मॅनेजर घोगरे, कर्मचारी भगवान बोनगाने, सोमनाथ दौंड आणि तात्याराव शेळके हे कार्यालयात पेट्रोल पंपावर जमा झालेली रोकड मोजत होते. त्यावेळी अचानक दुचाकीवर MH-20,UV-2674 आलेले दोन सशस्त्र लुटारू पिस्टल आणि गुप्तीसह आत शिरले. त्यावेळी सुरुवातीला शस्त्र लपवत आत शिरलेल्या लुटारूंनी पेटीएम आहे का ? अशी विचारणा केली. तेव्हा मॅनेजर घोगरे आणि कर्मचारी लुटारूंशी बोलत असतानाच त्यातील एकाने थेट पिस्टल बाहेर काढत तर दुस-याने पिशवीतून गुप्ती काढून धाक दाखवण्यास सुरुवात केली. काही क्षणात दोघांनी एक लाख 26 हजार रुपयांची रोकड असलेली बॅग घेत तेथून पळ काढण्याचा प्रयत्न केला. तेव्हा कर्मचा-यांनी विरोध करताच त्यातील एकाने पिस्टल रोखली. तरीही कर्मचारी त्या लुटारुंच्या मागे पळत असताना पुन्हा पिस्टल रोखत दोघांनी बनावट क्रमांकाच्या मोटारसायकल वर तेथून धूम ठोकली.
या घटनेची माहिती मिळताच दौलताबाद पोलीस ठाण्याच्या निरीक्षक राजश्री आडे यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता, सहायक पोलीस आयुक्त विवेक सराफ, गुन्हे शाखेचे निरीक्षक अविनाश आघाव, सहायक निरीक्षक अजबसिंग जारवाल, उपनिरीक्षक अमोल देशमुख यांच्यासह गुन्हे शाखा, सायबर पोलीस ठाण्याचे पथक दिवसभर तळ ठोकून होते. शहर व ग्रामीण पोलीस दलाकडून सर्वत्र नाकाबंदी करण्यात आली असून पोलिस लुटारूंचा शोध घेत आहेत. सर्व लुटीचा प्रकार सीसीटीव्ही कॅमे-यात कैद झाला आहे.
दौलताबाद पोलिसांनी हद्दीतील सर्व पेट्रोल पंपांना 3 ऑगस्ट रोजी एक नोटीस बजावली होती. त्यामध्ये पोलिसांनी परिसरात दरोडे, घरफोडीच्या घटना घडत आहेत. त्यामुळे पेट्रोलपंप येथे प्रशिक्षीत सुरक्षा रक्षक नेमावे, त्यांना राञ् पाळी ड्यूटी दरम्यान सतर्क राहण्यास सुचित करावे. पेट्रोलपंपाचा पूर्ण परिसर कवर होईल अशा प्रकारे अत्याधुनिक CCTV कॅमेरे बसवावे, पेट्रोलपंपावरील जास्तीचे व्यवहार हे कॅशलेश करावे. तसेच रात्रीचे वेळेस पेट्रोलपंपावर गरजेपेक्षा जास्तीची रक्कम ठेवू नये. सुरक्षारक्षकांना रात्रीचे वेळी लाठी, शिट्टी व टॉर्च जवळ बाळण्यास सूचित करावे. इतर अत्यावश्यक सेवेसंबंधी महत्वाचे संपर्क क्रमांक उपलब्ध करुन द्यावे. सर्व सूचनांचे पालन करावे यात हलगर्जीपणा करण्यात येवू नये. अशा आशयाची हि नोटीस होती.
*FOLLOW US ON FACEBOOK 👇*
https://www.facebook.com/a24newsweb/
*Take a look at A24NEWS (@A24NEWS1) TWITTER*👇
https://twitter.com/A24NEWS1?s=08
*A24NEWS ON YOUTUBE 👇*
https://youtube.com/channel/UCeVu5wghTEq0wIN953QWQpw
📽️ *A24NEWS & INFO. SERVICES*
👆 *SUBSCRIBE 👍 LIKE / 💬 COMMENT and 👉 SHARE*
🌐 *A24 NEWS Web Portal*
0 Comments