हजारो किलोमीटरचे अंतर पार करत अमूर ससाणा पालघर मध्ये दाखल
वर्षभरात सर्वाधिक लांब स्थलांतर करणारा पक्षी’ (२२,००० कि.मी हून अधिक) अशी विशेष ओळख असलेला अमूर फाल्कन हा हजारो किलोमीटरचे अंतर पार करत पालघर जिल्ह्यात विश्रांती साठी विसावला आहे पालघर मधील पर्यावरण विज्ञान (Environmental science) चे विद्यार्थी वैभव हलदीपुर ह्यांनी ह्या पक्षाच्या ठिकाणचा शोध घेत छायाचित्र कैद केले , जवळील वन्यजीव छायाचीत्रकर व पक्षी मित्र प्रविण बाबरे यांना सुद्धा या बद्दल कल्पना दिली मागील तीन वर्षांपासून ह्या पक्षाला आपल्या कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी उत्सुक असलेले प्रविण यांनी सुद्धा यांनी सुद्धा त्वरित त्या ठिकाणी भेट देत या पक्षाची सुंदर छबी कॅमेरा मध्ये केली आहे. अमूर फाल्कन समूहात स्थलांतर करणारा पक्षी आहे. पालघर मध्ये नर, मादी आणि त्यांचे पिल्लू असे कुटुंब गवतावर विसावले आहेत. काही दिवसातच हा पक्षी पुढील पुढील प्रवासासाठी शारीरिक रित्या सुदृढ होऊन काहीशा विश्रांती नंतर हा पक्षी अरबी समुद्र पार करून दक्षिण आफ्रिकेच्या दिशेने झेप घेत पुढील प्रवासाला सुरुवात करेल.
अमूर फाल्कन वर्षातून दोनदा ये-जा करतो. २०१८ नंतर तब्बल ३ वर्षांनी फाल्कन पालघर मध्ये स्थिरावला. विशेष म्हणजे ह्या पक्ष्याचा अर्धा मेंदू कायम सतर्क असतो. त्यामुळे फाल्कन सलग ४८ तासहून अधिक वेळ हा आकाशात उडू शकतो . भारतात अमूर, मर्लिन, शाईन आणि पेरिग्रीन असे चार प्रकारचे फाल्कन पाहायला मिळतात. कीटक, बेडूक किंवा काही वेळा छोटे पक्षी हे अमूर फाल्कनचे खाद्य आहे. रशिया मंगोलिया येथून अमूर फाल्कन भारतात नागालँड येथे दाखल होत तेथून प्रवास करत हे पक्षी पालघर आले असतील, असा अंदाज व्यक्त वर्तविला जात आहे.
*याव्यतिरिक्त पालघर जिल्ह्यातील किनारपट्टी आणि पाणथळ भागात तीनशेहून अधिक देशी-विदेशी पक्ष्यांचा वावर*
पालघर जिल्ह्यातील वसई , विरार , दातीवरे, नांदगाव, दांडी, उनभात, चिंचणी, वरोर, वाढवण , बोर्डी झाई ह्या किनारपट्टी भागात, नॉन डिस्टरबिंग भाग असल्या कारणा मुळे हे पक्षी येथे ऑगस्ट पासून दिसायला सुरुवात होत असते ह्या पैकी दातीवरे आणि वाढवण किनाऱ्यावर यातले पक्षी हमखास दिसत असतात सुमारे ४० हुन अधिक पक्षांचा ह्या किनाऱ्यांवर वावर आढळून येत आहे ह्यातील काही पक्षी हे विणीच्या हंगामात त्यांच्या घरट्यांसह दिसून आले आहेत, तांबड्या छातीची हरोळी , कलहंस , नीलिमा , नवरंग , काळ्या डोक्याचा खंड्या , हळदीकुंकू बदक , नकेर , चातक , लाल कंठाची तिरचिमणी , चिंबोरी खाऊ , रेड नेक फॅलेरोप, पलास गल, उलटचोच तुतारी , सफेद मोठा कलहंस , रंगीत तुतारी , ग्रे-प्लॉव्हर , रिंग प्लॉव्हर , कास्पियन प्लॉव्हर , या सारखे इतर समुद्रपक्षी आणि पाणथळ भागात दिसणारे पक्षी पालघर जिल्ह्याच्या किनारपट्टी भागांत आणि पाणथळ भागांत दिसतं असतात.
*समुद्रमार्गे किनारपट्टी भागात हजेरी*
समुद्र मार्गे ओमान हुन उडान घेऊन थंडीच्या महिन्यात वाढवण किनारी चिंबोरी खाऊ तसेच उत्तर अमेरिकेहून रेडनेक फॅलेरोप , मंगोलिया हुन उडाण घेऊन कलहंस हा पक्षी वाढवण मधील पाणथळ भागात दिसून आला आहे उत्तर अमेरीकेहू रेड नेक फॅलेरोप हा पक्षी चिंचणी भागातील पाणथळ भागांत दिसून आला आहे तर ह्या पक्षांन प्रमाणे इतर ४० हुन अधिक स्थलांतरित पक्षी आपल्या पालघर जिल्ह्यात दिसून आले आहे तर संपूर्ण पालघर जिल्ह्यात देशी आणि विदेशी पक्षी असे मिळून एकंदर तीनशे हून अधिक पक्षांच्या नोंदी पालघर मधील पक्षी मित्रांकडे आहेत आशा देशी विदेशी स्थलांतरित पक्षाच्या ठिकाणांचे जतन करणे गरजेचे असल्याचे पक्षी मित्रांकडून सांगण्यात येत आहे.
HP Live is a leading News Channel from Maharashtra bringing Latest and Breaking News from Around Maharashtra.
Contact us to report any news as a citizen reporter on 9545056667 or hanifmirror@gmail.com
https://www.youtube.com/user/hanifmirror
https://twitter.com/hplivenews1
http://google.com/+HPLive9545056667
https://m.facebook.com/groups/1944827725771861
https://m.facebook.com/hplivenews/
https://www.facebook.com/profile.php?id=100000567900512
https://hplive.news/
https://vm.tiktok.com/XffNEd/https://vm.tiktok.com/XffNEd/
https://www.instagram.com/invites/contact/?i=x919x643e3s3&utm_content=ihz4sw1
35 Amur falcon birds arrive in Palghar district before migrating to warmer climes
#Amurfalcon #birdwatchers #migratingbirds #GogtesaltpansNalasopara #birds #PravinBabre #migratorybird #Siberia #Russia #China #VasaiVirar #HPLiveNews #BreakingNews #VasaiVirarNews #AmurfalconbirdsarriveinPalghar #Environmentalscience
0 Comments